
वैभववाडी : तालुक्यातील उंबर्डे - वैभववाडी - फोंडा या मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत अन्यथा त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
उंबर्डे ते फोंडा या राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.लोरे नबंर एक ते वैभववाडी बाजारपेठेपर्यत या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत.वाभवे कासारव्हाळ ते वैभववाडी शहरापर्यतचा रस्ता तर वाहतुकीस अयोग्य बनला आहे.
खड्ड्यामुळे काही अपघात देखील झाले आहेत. गणेश चतुर्थीत या मार्गावरून वाहनांची वर्दळही वाढणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी श्री.लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.पावसाळी डांबर किवा कॉक्रींटने हे खड्डे बुजवावे जर १५ दिवसांत खड्डे बुजविले नाही तर कासारव्हाळ ते वैभववाडी या मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येइर्ल असा इशारा श्री.लोके यांनी दिला आहे.