
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यालयाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. शासनाच्यावतीने फेब्रुवारी २०२५मध्ये इयत्ता ५वी ८वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.याचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणवत्ता यादी जाहीर झाली यामध्ये अ.रा.विद्यालयाचे गौरांग ढवण, वैष्णवी गणेश हावळ व .सिद्धेश संतोष भंडारी यांनी ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये समावेश आहे. सिद्धेश भंडारी याने एन.एम.एम.एस. परिक्षेत देखील उज्वल यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या बाह्य परिक्षा विभाग प्रमुख विभाग प्रमुख एस.व्ही.भोसले, पी.पी.सावंत,पी.बी.पवार, एम.एस.चोरगे,एस.टी.तुळसणकर, ए.जी.केळकर, जे.एस.बोडेकर, ए.एस.परिट, एस.ए.सबनिस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे संस्थेच्यावतीने कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक सर्व शिक्षक उपस्थित होते.