परमे सोसायटीच्या निवडणुकीत वैभव सहकार परिवर्तन पॅनलचा विजय

भाजपा पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव | १० हि जागांवर मिळावीला मोठा विजय
Edited by:
Published on: April 06, 2025 15:22 PM
views 220  views

दोडामार्ग : परमे ग्रुप विविध कार्यकारी सेवा संस्था, भेडशी या संस्थेच्या पंचांवार्षिक निवडणुकीत शिवसेना व इतर पक्ष पुरस्कृत वैभव सहकार परिवर्तन पॅनलने भाजपा पुरस्कृत पॅनलला चितपट करत दहा जागांवर मोठा विजय मिळविला आहे. 

या विजयानंतर शिवसेनेकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.  केवळ एकट्याच्या हट्टाआसा मुळे हि निवडणूक झाली. मात्र मतदारांनी त्यांचा सुफडा साफ केल्याची प्रतिक्रिया गणेश प्रसाद गवस यांनी दिली. भाजपाचे मंडळ अध्यक्ष सुधीर दळवी यांच्याच कुटुंबातील तीन ते चार उमेदवार असल्याने नाव न घेता गणेशप्रसाद गवस यांच्यावर तोफ डागली. तर दळवी व भाजपा पुरस्कृत पॅनल ला रोखण्यासाठी उबाठा चे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, काँगसचे वासुदेव नाईक या मंडळींनी या निवडणूक मध्ये एकमोठ बांधल्याचे पाहवयास मिळाले. विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करतेवेळी शिवसेनेशी युती केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र पाहवयास मिळाले. विजयी उमेदवार शैलेश दळवी, रामदास मेस्त्री, वासुदेव नाईक,संगीता वेटे, गणेश धूरी, लाडू जाधव, लक्ष्मण मयेकर, धाकू जंगले, आत्माराम देसाई, लक्ष्मण मयेकर यांसह अरुण गवंडळकर, बाबा बेळेकर यांचेही शिवसेनेचे पदाधिकारी गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर यांसह उबाठा शिवसेनेचे बाबूराव धूरी, काँग्रेसचे वासुदेव नाईक, संजय गवस, संदीप गवस, मायाकल लोबो, गोपाळ गवस, संतोष घोगळे यांसह मोठ्या संख्यने  शिवसैनिक उपस्थित होते.