आंबा - काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या !

वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 29, 2023 20:04 PM
views 202  views

सिंधुदुर्ग :  सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बागायतदार हे आंबा काजू पिक विमा योजना २०२३-२४ चा लाभ घेऊ शकलेले नाहीत.तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पिक विमा २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी राज्याचे  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 


       आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, आंबा काजू पिक विमा (२०२३-२४) भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठेवण्यात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. शेतकरी बागायतदार यांना पिक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंद करणे आवश्यक असल्याने बहुतांश शेतकरी पिक विमा योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पिक विमा २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे.