ओरोस सावंतवाडा भवानी मंदिरातील सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण !

सभामंडप उभारण्याचा शब्द वैभव नाईक यांनी पूर्ण केला
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 20, 2023 13:21 PM
views 145  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ओरोस सावंतवाडा श्री. देवी भवानी मंदिर येथे सभामंडप उभारण्यात आला आहे. यासाठी १५ लाख रु. चा निधी आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला होता. गुरुवारी  त्यांच्या हस्ते फित कापून सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सवात आ. वैभव नाईक या मंदिरात भेट देतात. या  मंदिरात सभामंडप उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करत लवकरात लवकर सभामंडप उभारण्याचा शब्दही आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला होता.त्यांनी दिलेला शब्द पुरा करत भवानी मंदिर येथे प्रशस्त असा सभामंडप उभारण्यात आला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

याप्रसंगी शिवसेना ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, छोटू पारकर, सुनील जाधव, योगेश तावडे, भगवान परब, रवी कदम, सुरेश सावंत, देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मंगेश सावंत, सुशील निब्रे, सागर परब, महादेव परब, रवी परब, सुनील वंजारे, बाळा दळवी, पपू सावंत, शिवा गोसावी, बाळू गोसावी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.