वैभव नाईक तुम्ही दहा वर्षात एक आमसभा घेऊ शकत नाही

रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार : धोंडी चिंदरकर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 11, 2024 06:48 AM
views 139  views

मालवण : वैभव नाईक तुम्ही दहा वर्षात एक आमसभा घेऊ शकला नाहीत. आणि तुम्ही पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर टीका करता? तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? तुम्हाला रवींद्र चव्हाणच घरी बसवणार असा इशारा देताना निलेश राणे 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला. 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारावर आमदार वैभव नाईक यांनी टीका केली होती. त्याला धोंडी चिंदरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चिंदरकर म्हणाले, वैभव नाईक तुम्ही १० वर्ष काय करु शकला नाही त्याची यादी तुम्हीच मिडिया समोर वाचली. तुम्ही १० वर्षात एक आमसभा घेऊ शकला नाहीत आणि तुम्ही जनता दरबारावर टीका करता? तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? बरं झालं तुम्हीच समस्यांची यादी वाचली लोकांना तरी कळलं की तुम्ही १० वर्षात आमदार म्हणुन किती अपयशी आहात. सत्तेतल्या अडीज वर्षात पुर्ण न करु शकलेला एस टी डेपो सोडला तर तुमच्या कल्पकतेतल एक काम सांगा जी जनता लक्षात ठेवील. जनतेचा निर्धार आता पक्का आहे,   आ.वैभव नाईक यांना धक्का. तेव्हा कितीही करा कितीही बोंबा आता मारा रविंद्र चव्हणच तुम्हाला घरी बसवणार. फुल प्रूफ प्लॅन तयार आहे फक्त निवडणुकीची निवडणुकीची वाट बघतोय. किमान पन्नास हजारच्या फरकाने निलेश राणेना विजयी करणारच असे चिंदरकर म्हणाले.