
कुडाळ : विधानसभा निवडणूकीला अवघे काही दिवस शिल्लक राहीले असून सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जात मतदारांच्या भेटी गाठी घेऊन आपापल्या उमेदवाराच्या प्रचारावर भर दिलेला दिसून येत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारात नेरुर विभागातील कार्यकर्ते नेरुर गावात घरोघरी प्रचार करण्यात सक्रिय झालेले आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तसेच नेरुर ग्रामपंचायत सदस्य रुचा राजन पावसकर , समीर दत्ताराम नाईक यांच्यासह साबाजी नाईक , प्रमोद नाईक ,एकनाथ नाईक ,अजय नारींग्रेकर, मंदार वाक्कर , मनोज नाईक , मनोहर ठाकूर वेदिका जोशी काशिनाथ नाईक आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.