वैभव नाईकांना किंमत मोजावी लागेल ; श्री सदस्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संतोष कानडेंचा इशारा

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 24, 2023 13:13 PM
views 495  views

कणकवली : श्री सदस्या बद्दल आ. वैभव नाईक यांनी अपमानास्पद जे वक्तव्य केले आहे, वक्तव्याचा निषेध करतो. त्याची त्यांना किंमत मोजायला लागेल. अवघ्या १० महिन्यांचा आ. नाईक यांचा कालावधी राहिला आहे. या वेळेत त्याची जनतेच्या हिताचे प्रश्न मांडावेत. लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. संप्रदाय बद्दल तुम्ही बदनामी करत असाल तर जशास तसे उत्तर दिला जाईल. मात्र,कुडाळ - मालवण विधानसभेचे पुढील आमदार निलेश राणेंच असणार आहेत. राजकारण आणि अध्यात्म यात फरक आहे, हे वैभव नाईक यांनी  लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे. कणकवली येथील केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष सोनू सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत,संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

उबाठा सेनेचे उपजूनी करंटा,ने ने अद्वैत वाटा..आपल्याला करायचे आ.वैभव नाईक सोडून बोलत आहेत.हे श्री सदस्या बद्दल सभागृहात हे चुकीचे आहे.त्याबद्दल नितेश राणे यांनी लोकांसमोर माडण्याचे काम करताहेत,त्यावर टीका वैभव नाईक करत आहेत.आता अवघे १० महिने नाईकांचे राहिले आहेत,आपल्या आमदारकीचे कालावधीत जनतेची दिशाभूल थाबवावी,असा टोला संतोष कानडे यांनी लगावला.


भविष्यात निलेश राणे हे आपला निश्चित पराभव करणार आहेत.जे श्री सदस्या बद्दल बोलला आहेत,त्याची किंमत तुम्हाला मोजायला लागेल.आता पासून भोग भोगायला लागेल. संप्रदाय लोकांना बोलून डीवचू नका. आ.नितेश राणेंनी जे सभागृहात मांडला तेच सांगितले. जर ते बोलला नसला तर खुलासा करा,अशी मागणी संतोष कानडे यांनी केली आहे.

राजकारण आणि हरीनाम यात फरक आहे.अन्य विकासाचे मुद्दे मांडा,अन्यथा भोग भोगावे लागतील.श्री सदस्या बद्दल आ.नितेश राणे  यांच्या बद्दल संभ्रम पसरवू नका,असा सल्ला संतोष कानडे यांनी दिला आहे.