शिवसेनेने मंजूर केलेल्या कामांचं वैभव नाईकांनी श्रेय घेऊ नये : वर्षा कुडाळकर

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 19:21 PM
views 122  views

कुडाळ : शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आज कुडाळ येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत आमदार वैभव नाईक यांना लक्ष्य केले. कुडाळ मालवण मतदाराचे ठाकरे गटाचे आमदार हे कुडाळ मालवण मतदार संघामध्ये जी काम दीपक केसरकर, उदय सामंत यांनी मंजूर केली,ती काम आपण केल्याचे सांगत आहेत. आता कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाही हे सांगत आहेत की ती काम आम्हीच मंजूर केली. आणि आम्हीच केली असं जे म्हणत आहेत त्याचा आम्ही शिंदे गट कुडाळच्या वतीने जाहीर निषेध करतोय. शिंदे गटाच्या वतीने आतापर्यंत आम्ही बरीच विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत.असे वर्षा कुडाळकर यांनी यावेळी सांगितलं.

सिंधु रत्नचे अध्यक्ष दीपक केसरकर, प्रमोद जठार ,भैय्या सामंत ह्यानी हा निधी दिला आहे. सिंधू रत्न या योजनेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ५० कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कुडाळ मालवण  मध्ये बरीचशी काम मंजूर झालेली असून सुद्धा आता त्याचं श्रेय अनेक जण घेत आहेत. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक काम मंजूर झालेली आहेत. जल सुविधा,रस्ते सुविधा अशा अनेक योजनांना भरघोस निधी दीपक केसरकर यांनी दिला आहे. तर शिंदे गटाच्या माध्यमातून आम्ही काम करायची आणि बाकीचे लोक येऊन त्या ठिकाणी उद्घाटन करणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी जी जी कामे शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये जी काम मंजूर होत आहेत आणि त्या कामांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही आहे ती सर्वच्या सर्व कामे आम्ही करणार आहोत  आणि त्याचं उद्घाटन आणी भूमिपूजन देखील आम्हीच करणार आहोत. यामध्ये कोणीही पडू नये असं इशारा शिवसेनेच्या जिल्हा महिला प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

यावेळी तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, उप तालुका प्रमुख अरविंद करलकर आणि महिला विभाग प्रमुख अनघा रांगणेकर यावेळी उपस्थित होते.