वैभव नाईक घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

विविध प्रश्नांकडे वेधणार लक्ष !
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 29, 2024 08:11 AM
views 645  views

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवार ३० मे २०२४ सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. 

         त्याचबरोबर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक गावात पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी दुपारी १२ वाजता आ. वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट  घेणार आहेत.तरी नागरिकांच्या पाण्यासंदर्भात तसेच अन्य काही समस्या, अडचणी असतील तर त्याबाबतचे निवेदन घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.