
कुडाळ : कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे नेहमी सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहतात. त्यांच्यासोबत कोणताही मोठा लवाजमा किंवा सुरक्षारक्षक नसतो. म्हणूनच नाईक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कुठले अंतर राहत नाही. त्याची प्रचिती आपल्याला महाशिवरात्र दिनानिमित्त दिसून आली.
कुडाळ तालुक्यातील एका मंदिरामध्ये सायंकाळी मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांनी चुलीवरची भजी खाण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी आमदार नाईक यांनी तेथिल एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत चुलीवरच्या भज्यांचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे आमदार नाईक यांनी सर्वसामान्यांची संवाद साधला. त्यामुळे आपल्या साध्या राहणीमानाची अनुभूती या निमित्ताने नाईक यांनी करून दिली. यावेळी सर्वसामान्यांच्या गराडा आमदार नाईक यांच्या भोवती पडला होता.










