
कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमदार वैभव नाईक आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. सभास्थळापासून प्रांत कार्यालयापर्यंत ठाकरे गटाच्या रॅलीला सुरुवात झाली आहे. रॅलीला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपा कार्यालया समोर रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॅलीला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले आहेत. भर उन्हात शिवसैनिक रॅलीत सहभागी झालेत. आमदार वैभव नाईक यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.