बाजीप्रभू प्रमाणे वैभव नाईक सिंधुदुर्गात लढत आहेत : गौरीशंकर खोत

Edited by: विनायक गावस
Published on: February 04, 2024 07:34 AM
views 125  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, बाजीप्रभू प्रमाणे वैभव नाईक सिंधुदुर्गात लढत आहेत. त्यांना शैलेश परब, रूपेश राऊळ, बाळु परब, संजय गवस, मायकल डिसोझा आदींसारख्या लढवय्यांची साथ मिळत आहे. महाराष्ट्रात गुंडशाहीच राज्य सुरू आहे. भाजप आमदारन शिंदेंच्या शहरप्रमुखावर गोळ्या झाडल्या. एका अदृश्य मशीनच्याद्वारे भ्रष्टाचार केल्यानंतर नमो म्हणा आणि मंत्री व्हा अशी योजना आहे‌‌. स्थानिक आमदारांकडे ८८ कोटींची संपत्ती आली कशी हा सवाल आम्हाला पडतो. सावंतवाडीत एखादं दुकानही दिसत नाही. असेल तर त्याची कल्पना नाही अशी टीका त्यांनी केली. 

यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, सतिश सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, सुशांत नाईक, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.