दहावीत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वैभव नाईकांनी केला सत्कार

Edited by:
Published on: May 16, 2025 17:52 PM
views 72  views

कुडाळ : दहावी परीक्षेत कुडाळ हायस्कुलच्या स्मितेश विनोद कडोलकर याने ९९.४० टक्के  गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर रिया राकेश पाटणकर हिने ९९ टक्के गुण मिळवून  कुडाळ तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला असून, आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देत  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

तसेच कुटूंबियांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मूळ अणाव गावचा रहिवासी आणि  दादर येथील डिसिल्वा हायस्कुलमध्ये शिक्षण घेत असलेल्या कौस्तुभ सचिन वारंग याने दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविले असून त्याचाही सत्कार वैभव नाईक यांनी केला.  

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,संतोष अडुलकर,युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, शैलेश काळप, अणाव येथे सरपंच लीलाधर अणावकर, माजी सरपंच आप्पा मांजरेकर, शिवसेना लॉटरी सेना अध्यक्ष मनोज वारंग, सचिन वारंग व विद्यार्थ्यांचे आईवडील तसेच कडोलकर, पाटणकर व वारंग कुटुंबीय उपस्थित होते.