
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी संत रविदास समाजभूषण पुरस्कार वितरण, स्पर्धा बक्षीस वितरण, संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन, विशेष कार्य समाजबांधव गौरव व स्मरणिका प्रकाशन समारंभ देखील संपन्न झाले. संत रविदास भवनाच्या इमारतीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १५ लाख रु. निधी देण्यात आला होता. त्याबद्दल चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी वैभव नाईक यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला.
यावेळी मा. आम. वैभव नाईक म्हणाले चर्मकार समाज मंडळाच्या माध्यमातून समाज बांधवांना एकसंघ ठेवण्याबरोबरच त्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्याला समाजबांधवांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे हे कौतुकास्पद आहे. चर्मकार समाज उन्नती मंडळाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागणीनुसार संत रविदास भवन इमारतीसाठी निधी दिला होता. आता तुमच्या हक्काची वास्तू उभी राहिली आहे. यामाध्यमातून समाजाची आणखी उन्नती होईल असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपसभापती जयभारत पालव, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोस्कर,चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, हुमरमळा सरपंच समीर पालव, उपसरपंच संचिता पालव, माजी सरपंच जान्हवी पालव, माजी सरपंच महानंदा बांदेकर, सुप्रिया वालावलकर, अॅड. अनिल निरवडेकर, विजय चव्हाण, उद्योजक संजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कार्यकारिणी जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दीपक समजीसकर, उत्तम चव्हाण, ज्ञानेश्वर तबकटकर यांसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.