श्री वडमळेश्वर मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेला वैभव नाईकांची भेट

Edited by:
Published on: February 12, 2025 18:15 PM
views 216  views

कुडाळ :  श्री वडमळेश्वर मित्रमंडळ पाट यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे यांचाही सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, ऍड रुपेश देसाई, अनिल बागवे, गिरिप्रसाद राऊळ, उमेश प्रभू, मकरंद मराळ, निखिल माधव, तुषार माधव, संजय पारकर, प्रसाद हळदणकर, सुरेश कांबळी, बाळा ठुंबरे, विठ्ठल माधव, चेतन माधव, गणेश वडाणकर,आप्पा मराळ, कांता चव्हाण, कृष्णकमळ येरम, महेश परब यांसह शिवसैनिक व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.