वैभववाडी : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात एक वेगळाच प्रभाव होता. त्यामुळे ठाकरे शिवसेनेची पिछेहाट झाली. मात्र या पराभवानंतर आम्ही खचून जाणार नाही. शिवसेना ही संघटना आहे. जनतेच्या हितासाठी जिल्ह्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करणार असं माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
वैभववाडी तालुका ठाकरे शिवसेना तालुका कार्यकारिणी बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी श्री नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोबत सतिश सावंत, सुशांत नाईक, मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, नलिनी पाटील यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री नाईक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच प्रभाव होता. त्यामुळेच आमच्या पक्षाची पिछेहाट झाली. याच चिंतन आम्ही केलं आहे. या पराभवानंतर आम्ही खचून जाणारं नाही, पुन्हा हिम्मतीने जिल्ह्यात संघटना उभी करणार आहोत. जनतेच्या हितासाठी वेळोवेळी आवाज उठवून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच काम आम्ही करणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले, गेले वर्षभर करुळ घाट वाहतूकीसाठी बंद आहे. घाटतील काम पुर्ण झालं आहे. येत्या १६जानेवरीला घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला न झाल्यास ठाकरे शिवसेना स्वतः घाटमार्गातून वाहतूक सुरू करणार असल्याचे श्री नाईक यांनी स्पष्ट केले.
.