चंद्रकांत परब यांच्या मेडिकलचा वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ

Edited by:
Published on: January 08, 2025 15:14 PM
views 207  views

कणकवली : कळसुली येथील चंद्रकांत परब व सौ. चिन्मयी परब यांनी कणकवली तहसील कार्यालयाच्या मागे नव्याने सुरु केलेल्या श्री गजानन मेडिको या व्यवसायाचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आला. यावेळी नवीन व्यवसायासाठी वैभव नाईक यांनी परब कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कळसुली ग्रा. प. सदस्य नंदकिशोर परब, ऍड. मिलिंद सावंत, हळवल  ग्रा. प. सदस्य रोहित राणे, मधू चव्हाण, रामचंद्र नाईक, रविकांत सावंत, बबली राणे, सत्यविजय परब, वासुदेव वायंगणकर, शिवाजी परब, कृष्णकांत चव्हाण, संतोष मुरकर, नारायण परब, ज्ञानदेव परब आदी उपस्थित होते.