वैभव नाईकांच्या उपस्थितीत मुंबईस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

Edited by:
Published on: December 18, 2024 11:43 AM
views 315  views

कुडाळ :  माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मुंबई शिवसेना भवन येथे संपन्न झाली. यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत निवडणुकीतील सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच लवकरच मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांचा मेळावा घेणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी नितीन वाळके, अपूर्वा प्रभु, ओमनाथ नाटेकर, पंढरी तावडे, किरण आकेरकर, सुशांक घाडी, निनाद प्रभु, जयंत गवंडे, सुहास गावडे, रामचंद्र परब, विश्राम धुरी, विजय देसाई, श्री. आजगावकर, गोपाळ परुळेकर, श्री पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.