
कुडाळ : दहा वर्षाच्या आमदारकिचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी नाही केला तर फक्त जनतेसाठीच केला. मी इतरांप्रमाणे फेर मतमोजणीची मागणी करणार नाही. माझा झालेला पराभव मला मान्य आहे. नवनिर्वाचित आमदारांनी मतदार संघातील विकास कामे करावीत, राज्य शासनाने लाडक्या बहिणीला देऊ केलेले 2100 रुपये बंद केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला.
मतदारसंघातील 72 हजार लोक माझ्या सोबत आहेत हाच माझा विजय आहे असे सांगत पुन्हा जोमाने कामाला लागा असे आवाहन वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. विकास कामे करूनही पराभव होतो यावर माजी आमदार वैभव नाईक यांना रडू कोसळले.