वैभव नाईकांनी मानले आभार

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 21, 2024 15:48 PM
views 564  views

कुडाळ : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांनी मतदारांस हा सर्व जनतेचे आभार मानले आहेत. 

विधानसभा निवडणूक कुडाळ मालवण मतदार संघातून सर्व मायबाप जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावला त्यासाठी आपले खूप खूप आभार महाराष्ट्र व देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे येऊन मतदान केले ही कौतुकास्पद बाब आहे. सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार अशा भावना सोशल मीडिया द्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.