उबाठा ग्रा. प सदस्य वैष्णवी लाड भाजपात

वैभव नाईक यांना महायुतीचे धक्के सुरूच
Edited by:
Published on: November 09, 2024 20:18 PM
views 234  views

मालवण : खरारे पेंडूर ग्रामपंचायत उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड व त्यांचे पती विष्णु लाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यावेळी उपस्थित होते. 

खरारे पेंडूर या मोठया ग्रामपंचायत मध्ये 11 सदस्य पैकी 9 भाजपा सदस्य बहुमतताने विजयी झाले. तर एकमेव उबाठा महिला सदस्य वैष्णवी लाड होत्या. आता यांनी वैभव नाईक यांना रामराम करून गाव विकासाचा दृष्टीकोन ठेवून महायुतीच्या माध्यमातून भाजपात प्रवेश केला. आपले पती हे गेली अनेक वर्षे खा. राणे साहेब यांच्या सोबत होते. गेली तीन चार वर्षे गैरसमजातून आम्ही उबाठात गेलो. मात्र गावात जनतेला अपेक्षित असलेल्या सर्वांगीण मोठा विकास होत नव्हता. गतिमान विकास हा महायुती व राणे साहेब यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे वैष्णवी लाड यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात सातत्याने उबाठा उमेदवार वैभव नाईक यांना धक्के सुरु आहेत. त्यांच्या अपयशी कारभाला कंटाळून अनेकजण त्यांची साथ सोडत आहेत. आगामी काळात ही संख्या आणि वाढणार आहे. त्यांच्या पदाधिकारी सहकाऱ्यांप्रमाणे जनताही वैभव नाईक यांना कंटाळली असून त्यांचा पराभव निश्चित झाला आहे. असेही यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, सतीश वाईरकर, नंदू नातू, दादा वायंगणकर, आशिष हडकर आदी उपस्थित होते.