सिंधुदुर्गनगरी : सर्वसामान्यांचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथील पायाची शस्त्रक्रिया केलेल्या दीपक भोई यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. दीपक भोई यांची काही दिवसापूर्वी पायाची शस्त्रक्रिया झाली होती. शिवसेना विभागप्रमुख गुरु सडवेलकर यांनी दीपक भोई यांच्या आर्थिक स्थितीबाबत आणि पायाचा शस्त्रक्रियेबाबत आमदार वैभव नाईक यांना माहिती दिली होती. त्यानुसार आ. वैभव नाईक यांनी दिपक भोई यांना आधार देत औषधोपचारासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आर्थिक मदत केली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख गुरु सडवेलकर,मुंबई येथील ज्येष्ठ शिवसैनिक विनायक (भाई) परब, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, उपशाखाप्रमुख संतोष परब,राजू भोई, गिरीश सावंत आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.