
सिंधुदुर्गनगरी : माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कसाल बाजारपेठेतील श्री सिद्धिविनायक मंदिरा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. कसाल बाजारपेठ येथील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी माघी गणेश जयंती साजरी केली जाते. यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माघी गणेश जयंती निमित्त यावर्षी बी के एल वालावलकर रुग्णालय डेरवण या रुग्णालयाच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत संपन्न होणार असून, या शिबिरामध्ये दमा, मधुमेह, नेत्र तपासणी, रक्तदाब, हृदयरोग, दंत तपासणी, , स्त्री रोग, रक्त, फिजिओथेरपी, तसेच जनरल तपासणी केली जाणार आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर ही सहभाग घेणार असून यात डॉक्टर विद्याधर तायशेटे, डॉक्टर प्रशांत कोलते, डॉक्टर शाम राणे, डॉक्टर सुहास पावसकर, डॉक्टर श्रद्धा मालवणकर, डॉक्टर प्रीती पावसकर, डॉक्टर दर्शना कोलते, डॉक्टर वैभव आईर, डॉक्टर उन्मेश पटवारी, डॉक्टर सिद्धार्थ परब हे सहभागी होणार आहेत. या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन इव्हेंट चेअरमन नवीन बांदेकर, ट्रेझरर प्रथमेश सावंत, अध्यक्ष अरुण मालवणकर, सचिव दीपक आळवे यांनी केले आहे.










