
सावंतवाडी : शहरात काही ठिकाणी मटका व्यवसाय सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. ऑनलाईन सुरू असणारा मटका आता ऑफलाईन देखील घेतला जात आहे. याबाबत पोलिसांनी विचारलं असता अवैध व्यवसायांवर कारवाई केली जाणार अशी माहिती त्यांनी दिली. काही ठिकाणी टपऱ्यांवर हा मटका व्यवसाय सुरू आहे. मधल्या काळात हा व्यवसाय बंद होता. पोलिसांकडून धडक कारवाई यावर केली गेलेली. त्यामुळे चोरीछुपा पद्धतीने ऑनलाईन मटका घेतला जात होता. मात्र, आता पुन्हा चिठ्ठ्यांवरचे आकडे बाजारात आलेत. ऑफलाईन मटका स्वीकारला जात असून सर्वत्रच तो सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसांना विचारल असता ते म्हणाले, कोणताही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही. पोलिसांकडून यावर वेळोवेळी कारवाई केली गेली आहे. कुठेही मटका घेतला जात असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.










