अॅड. संग्राम देसाई यांचं वैभव नाईकांनी केलं अभिनंदन

महाराष्ट्र- गोवा बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी निवड
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 03, 2024 12:49 PM
views 340  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र- गोवा बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ वकील अॅड. संग्राम देसाई यांची निवड झाली आहे. बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी कोकणपट्ट्यातून निवडून जाणारे ते पहिलेच वकील आहेत. त्याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.  

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, उप तालुका प्रमुख बाळू पालव, राजू गवंडे, गुरु गडकर, अमित राणे, सागर भोगटे, केतन शिरोडकर आदी उपस्थित होते.