वैभव नाईक यांची ११ वर्षांची परंपरा कायम

७० हजार घरांमध्ये गणेश पूजा साहित्याचे वाटप सुरु
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 05, 2024 13:49 PM
views 33  views

सिंधुदुर्गनगरी :  कोकणात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली ११ वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक व  कुडाळ मालवण मधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट देण्यात येते. भक्तिभावनेने आणि आपुलकीने जवळपास ७० हजार घरांमध्ये हि प्रेमाची भेट पोहोचवली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक गावागावात त्याची सुरुवात करण्यात आली आहे.

        या माध्यमातून प्रत्येक घरातील श्री गणेशाकडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सेवा अर्पण केली जात आहे. हि प्रेमाची भेट  कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात  पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहेत. रात्र रात्र जागून शिवसैनिक हे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून उत्साहाने घराघरात पोहचवित आहेत. कुडाळ मालवणचे नागरिक आनंदाने ही भेट स्वीकारत आहेत.