वैभव नाईकांनी घेतला मतदानाचा आढावा !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2024 11:34 AM
views 152  views

मालवण : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत असून कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला. 


तसेच कणकवली, आचरा, मालवण कट्टा, कुडाळ व माणगाव येथील महाविकास आघाडीच्या बुथवर आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन  मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.