सुर्वे कुटुंबियांचं वैभव नाईकांनी केलं सांत्वन !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2024 11:17 AM
views 201  views

मालवण : तालुक्यातील हडी जठारवाडी येथील शिवाजी सुर्वे वय ३० यांचा अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्वे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.

 यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष आमरे, हडी  शाखाप्रमुख मयूर करंगुटकर, उपशाखाप्रमुख महेश सुर्वे, ग्रा. प. सदस्य भावेश सुर्वे, उमेश हडकर, महादेव सुर्वे, राजन सुर्वे,राघो साळकर आदी उपस्थित होते.