नांदरुख रस्त्यांचं वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 11, 2024 10:13 AM
views 97  views

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आनंदव्हाळ कातवड नांदरुख रस्ता कामासाठी २ कोटी ४० लाख व खैदा साळकोंबा नांदरुख रस्ता कामासाठी १ कोटी ९८ लाख रु मंजूर केले असून या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी पार पडला. 

          महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून हे रस्ते मंजूर करून घेतले आहेत. या कामांच्या निविदा झाली असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात देखील होणार आहे. सदर रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आ. वैभव नाईक यांनी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जाबसुद्धा विचारला होता. त्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. 

 यावेळी नांदरुख येथे उपस्थित शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, नांदरूख माजी सरपंच दिनेश चव्हाण, माजी उपसरपंच सुहास राणे, विलास चव्हाण, गजानन चव्हाण, सुनील चव्हाण, नंदकुमार चव्हाण, मेघा सावंत, विनोद चव्हाण, पोईप विभागप्रमुख विजय पालव, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, आयवान फर्नांडिस, अजिंक्य परब, विशाल धुरी, गणेश चव्हाण, युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, नीरज मांजरेकर, आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.