
मालवण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ४ डिसेंबर रोजी नौदल सेनेच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. परंतु निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचा फटका या महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा बसला आणि दोन दिवसापूर्वी महाराजांच पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. याची दखल घेत शिवप्रेमी आणि मनसेचे सरचिटणीस श्री वैभवजी खेडेकर यांनी आज तात्काळ याठिकाणी भेट घेऊन छत्रपतींसमोर नतमस्तक होऊन महाराज आम्हाला माफ करा अशी विनवणी केली.
यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही पाळू शकलो नाही याची आज खंत वाटते. ३५० वर्षापूर्वी महाराजानी उभारलेले गड किल्ले आजही दिमाखात उभे आहे परंतु आज आपण महाराजांचे उभे केलेले पुतळे सुद्धा सांभाळू शकत नाही याची खंत मनाला लागून राहिली आहे. यावेळी बोलताना असे म्हणाले की भविष्यात या ठिकाणी सर्व सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणच्या वतीने आम्ही एक भव्य असा पुतळा उभारू असे सांगितले त्यानंतर सर्व शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. यावेळी वैभव खेडेकर यांनी पुतळा दुर्घटनेवरून तहसीलदार आणि पोलीस निरिक्षक याना खडे बोल सुनावले.
यावेळी त्यांच्या समवेत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब ऍड अनिल केसरकर महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर कुणाल किनळेकर सुधीर राऊळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव मिलिंद सावंत शांताराम सादये खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे , संजय आखाडे (कामगार चिटणीस), प्रदीप भोसले, सोहम पाथरे, पास्कोल रॉद्रिक्स अमित इब्रामपूरकर सागर जाधव विशाल ओटवणेकर राजू कासकर विल्सन गिरकर आणि महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.