
सावंतवाडी : शनैश्र्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल सावंतवाडी मार्फत मिटकॉन मुंबई आणि फार्मास्युटिकल ऍन्ड केमिकल ॲनालिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गडहिंग्लज यांच्या सहयोगाने विद्यार्थांसाठी करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट कौन्सिलिंगचे सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चा सत्रात वैयक्तिकृत मार्गदर्शन, मूल्यांकन आणि योग्य करिअर पर्याय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
१९ मे २०२५ रोजी मिटकॉन मुंबई चे डिव्हिजन हेड स्वप्नील बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना क्लिनिकल रिसर्च आणि या मधील करियर च्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मिटकॉन मुंबई चे अकॅडेमिक कोऑर्डिनेटर अमित चाळके यांनी विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यू च्या माध्यमातून संवाद साधला. या सत्राच्या दुसऱ्या दिवशी २० मे २०२५ रोजी फार्मास्युटिकल ऍन्ड केमिकल ॲनालिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गडहिंग्लज चे संदीप गावडे आणि रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि त्या मधील करियर च्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रात महाविद्यालयाच्या डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी च्या विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या चर्चा सत्राचे समन्वयक म्हणून महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका वर्षा राणे, आर्या तानावडे, सृष्टी पिरणकर आणि फाल्गुनी प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरील चर्चा सत्राच्या यशस्वितेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे आणि विभागप्रमुख डॉ. संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.