२.४० लाख रुपयांची अवैध दारू जप्त

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 19, 2025 20:09 PM
views 198  views

देवगड : पोयरे मशवि वाडी येथे २ लाख ४० हजार किमतीचा अवैध दारू साठा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास मशवी वाडी पोयरे येथे करण्यात आली. ही कारवाई देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली  करण्यात आली आहे.

देवगड तालुक्यातील मशवि वाडी पोयरे येथे गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीचा मद्य साठा बाळगला.असल्याची माहिती देवगड पोलिसांना समजताच देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली छापा टाकून हा दारू साठा हस्तगत करण्यात आला. यावेळी २ लाख ,४० हजार रुपयांचा गोवा बनावटीचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला.

यातील संशयित आरोपी योगेश विलास मयेकर (४१) व ५८ वर्शीय महिला यांचे वर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई)नुसार कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात दिपेश दीपक तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आहे.ही कारवाई १८ ऑगस्ट२०२५ रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास मशवी वाडी पोयरे येथे करण्यात आली.

गणेशोत्सवापूर्वी देवगड पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे अवैध दारू धंदे वाले यांचे धाबे दणाणले आहेत.हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमाल मध्ये ३५ बॉक्स मधे १८० मिलीच्या ब्ल्यू ओशियन बेवरीज बॉब्ज व्होडका च्या १६८० बाटल्या किंमत १लाख ६८ रू किमतीचा,तसेच १५ बॉक्स ७२० बाटल्या १८० मीलीच्या रक्कम रु ७२,हजार एकूण रू २,लाख ४० हजाराचा मुद्देमाल देवगड पोलिसांनी हस्तगत केला.

या वेळी देवगड सहा.पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे ,पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई यांचे समवेत हेड कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक,पोलीस कॉन्स्टेबल दिपेश तांबे उमेश घाडी (चालक)यांनी छापा टाकून हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.