व्ही. पी. कॉलेज डी. फार्मसीचा निकाल 100 टक्के

निकिता गवळी सिंधुदुर्गात प्रथम
Edited by: लवू परब
Published on: June 25, 2025 20:57 PM
views 8  views

सावंतवाडी : व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलची विद्यार्थिनी निकिता गवळी ८२.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम आली असून डी. फार्मसीचा निकाल 100% लागला आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाचा  निकाल 100% लागला आहे.  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कामगिरी करत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

प्रथम वर्षाचा निकालात प्रथम क्रमांक – कु.निकिता गवळी (८२.५०%) द्वितीय क्रमांक – कु.सिद्धी गोसावी (८१. २०%) त्रितिय क्रमांक - कु.प्राची हनपडे (८०.%),  द्वितीय वर्षाचा निकाल प्रथम क्रमांक कु. संजना संजय मेस्त्री (८३. १८%) द्वितीय क्रमांक कु. नेहा सुंदर गावकर (८३%), तर तृतीय क्रमांक कु. प्रतिक्षा केशव शिंदे (८२.१८%)  यांनी पटकावला असून विशेष बाब म्हणजे प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.निकिता गवळी  हिने (८२.५०%) गुण  पटकावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे प्रेरणास्थान, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थी, शिक्षकवर्ग व पालकांत आनंदाचे वातावरण आहे. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अधिकच मजबूत झाला आहे. व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, मडखोलने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता व शिस्तबद्धतेमुळे सावंतवाडी तालुक्यात आपले स्थान अधिकच बळकट केले आहे.