व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदाचा 100 टक्के निकाल

Edited by:
Published on: June 02, 2023 17:13 PM
views 114  views

बांदा : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा चा शालांत प्रमाणपत्र परिक्षा  निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण ३९ सर्व विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  प्रशालेतून प्रथम मधुरा जगदिश पाटील  (९६.८० टक्के), द्वितीय अनुष्का अविनाश पंडित  (९५.६० टक्के), तृतीय नंदिनी नितीन धुरी  (९२.६० टक्के) चाैथा गाैरी मिलिंद नाईक (९२.४०), पाचवा मुक्ता मनोज कामत (९१.४०)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत , प्राचार्य मनाली देसाई, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष तनिशा सावंत, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.