गोवा बनावटीच्या दारू वाहतूक प्रकरणी उत्तम गावडेला पोलीस कोठडी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 16, 2023 11:06 AM
views 214  views

कुडाळ : पिंगुळी नवी वाडी येथे सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने उत्तम गावडे यांच्या घरामागील भागात गोवा बनावटीची १ लाख १ हजार २०० रुपयांची दारू पकडली. ही कारवाई महिन्यात दोन वेळा करण्यात आली असून उत्तम गावडे याला अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


कुडाळ व बांदा पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी पिंगुळी नवी वाडी येथील उत्तम गावडे यांच्या घरामागे छापा टाकून लाखो रुपयाची गोवा बनवण्याची दारू पकडली होती. यावेळी त्याला २ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. दरम्यान या घटनेला महिना होत नाही तोपर्यंत सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पिंगुळी नवी वाडी येथील उत्तम गावडे यांच्या घरामागे छापा टाकला असता या छाप्यामध्ये १ लाख १ हजार २०० रुपयांची गोवा बनवतीच्या दारूचा मुद्देमाल सापडून आला याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात उत्तम गावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान आज (शुक्रवार) कुडाळ प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद चव्हाण करीत असून याबाबत फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक आशिष जामदार यांनी दिली असून ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक शेळके तसेच आशिष गंगावणे, अनुप खंडे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई या पथकाने केली.