
सावंतवाडी : ओटवणे पंचायत समिती मतदार संघातून शिवसेनेमार्फत ओटवणे गावच्या माजी सरपंच सौ. उत्कर्षा उमेश गावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत दाखल केला. निवडणुक निर्णय अधिकारी तथा सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, चराठा सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच बाळू वाळके, सरमळे शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे, ओटवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, गुंडू जाधव, रमेश गावकर आदींसह ओटवणे, सरमळे, चराठा गावातील शिवसेना कार्यकर्ते तसेच महिला व ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.











