
कुडाळ : जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) तर्फे रुपेश कानडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला.
समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माणगाव आणि कुडाळ परिसरात रुपेश कानडे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. पक्षाचा आदेश मिळताच कानडे यांनी आज आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
तरुण नेतृत्व आणि दांडगा जनसंपर्क
रुपेश कानडे यांची तरुणांमधील लोकप्रियता आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा असलेला पुढाकार, ही त्यांची मुख्य ओळख आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काची दखल घेत आमदार निलेश राणे यांच्या त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. कानडे यांच्या उमेदवारीमुळे माणगाव मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) अधिक भक्कम स्थितीत आल्याचे मानले जात आहे.











