
सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे शिवसेना तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून कोणता उमेदवार देणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते.
अखेर आज विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे.यावेळी श्री. राऊळ म्हणाले, सावंतवाडी तालुक्यात आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवत आहोत. महाविकस आघाडीसाठी आम्ही आग्रही आहोत. तर, आपल्यासोबत पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदार असून जनता मला निष्ठेच फळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, दिनेश सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











