
सावंतवाडी : शहरातील दैवज्ञ गणपती मंदिर समोरील सार्वजनिक विहीरीत खासगी पंप टाकून पाण्याचा वापर केल्याने इतरांना पाणी मिळत नसल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, रस्ते फोडून पाईप टाकत पंपाने पाणी येथील काही रहिवाशांनी घेतल आहे. ही विहीर सार्वजनिक असून आज विहीरीवरून पाणी नेण्यासाठी पाणी शिल्लक नाही. अजून एप्रिल, मे महिना शिल्लक असताना ही परिस्थिती असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी व्यक्त केले आहे.











