कणकवलीत गारांसह अवकाळी पाऊस !

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 26, 2026 15:56 PM
views 161  views

कणकवली : एकीकडे गुरुवारी सकाळपासून कणकवली शहर आणि परिसर उन्हामध्ये तापत असतानाच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू झाला. विशेष म्हणजे पावसासोबत गारा देखील बरसू लागल्या. 


गुरुवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये उष्णता जाणवत होती. दुपारच्या सुमारास रणरणते ऊनही होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ढगांचा काहीसा गडगडात होऊ लागला. अखेरीस ३ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत गारा सुद्धा पडू लागले. साहजिकच दिवसभराच्या उष्ण वातावरणानंतर नागरिकांना काहीसा गारवा अनुभवायला मिळालाय.