मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची ६ जुलैला तातडीची बैठक...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 04, 2023 20:42 PM
views 119  views

कणकवली : मनसे अध्यक्ष  राज  ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवार दिनांक 6 जुलै रोजी मनसेच्या  सर्व आजी माजी पदाधिकारी , पक्षाच्या सर्व अंगीक्रुत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तातडीची बैठक तालुका निहाय आयोजित केली आहे.

देवगड : गुरुवार दिनांक 6 जुलै  सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, घाटे पेट्रोल पंप समोर कावले वाडी रोड देवगड, कणकवली- गुरुवार दिनांक 6 जुलै दुपारी 2 वाजता जलतरण हॉटेल कणकवली, वैभववाडी  - गुरुवार दिनांक 6 जुलै संध्याकाळी 5 वाजता (मनसे कार्यालय वैभववाडी) या ठिकाणी होणार असून या बैठकीला मनसेचे राज्य सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस  गजानन राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.