
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा आज मंगळवार दिनांक 24/02/2026 रोजी दुपारी ठीक 4.00 वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदरील सभेत महावितरण कंपनीने एकूण 362500 वीज ग्राहकांपैकी तब्बल 42000+ वीज ग्राहकांवर जबरदस्ती लादलेल्या स्मार्ट मीटर विरोधात पुढील रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 468 प्रामाणिक वीज ग्राहकांचे स्मार्ट मीटर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट मुंबईतून ऑटो डिस्कनेक्ट केलेले आहेत त्याविषयी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ओरोस तसेच CGRF, कुडाळ येथे अन्यायग्रस्त वीज ग्राहकांच्या एकत्रित तक्रारी दाखल करण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तरी MSEB प्रशासनाच्या गैरकारभाराला, मनमानी फतव्यांना कंटाळलेल्या पिडित वीज ग्राहकांनी आजच्या सभेत उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष संजय लाड, सचिव तुकाराम म्हापसेकर, जिल्हा समन्वयक ॲड. श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.










