खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस अंमलदार पराग मोहिते यांचं निधन

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 24, 2026 11:14 AM
views 44  views

कणकवली : सिंधुदुर्ग पोलीस दलातील खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते ( वय 39,  मूळ रा. आंबेड, बुद्रुक ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झाले. पराग मोहिते हे 26 डिसेंबर 2012 रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाले होते. 29 सप्टेंबर 2020 पासून पराग हे कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत खारेपाटण पोलिस दूरक्षेत्र येथे सध्या ते नेमणुकीस होते. अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी, आई व वडील असा परिवार आहे.