५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम बघतय कोण ?

संजू परब आक्रमक ; सभागृहात घेतला आक्षेप
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 24, 2026 12:26 PM
views 211  views

सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण घेतला. पण, हे काम बघतय कोण ? बांधकाम विभाग हे काम बघत असल्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आक्षेप घेतला. 

५७ कोटीच सुरू असणार २० टक्के काम योग्य झालंय का ? बांधकामच्या अधिकाऱ्यांना हे काम जमणार का ? त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी परब यांनी केली. ५७ कोटी खर्च करून घरोघरी पाणी पुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी देखील त्याला निवृत्त पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच मार्गदर्शन यात घेण्याची सुचना केली. श्री. परब यांनी पाणी पुरवठा विभागात आणखीन दोन माणसं वाढविण्याची मागणी केली.