
सावंतवाडी : भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून व भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रयत्नातून स्वादुपिंडाने त्रस्त असलेल्या भटवाडी येथील स्वानंदी दशरथ गावकर हिला तातडीची मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, प्रभाग अध्यक्ष रवी नाईक, बंडया केरकर,एकनाथ पेडणेकर, बापू सुभेदार, मिलाग्रीस शाळेच्या शिक्षिका अनिता सडवेलकर, वि. स. खांडेकरचे मुख्याध्यापक राजाराम पवार, रंजन लाखे, रवी परब, समिधा नाईक, निलम मेस्त्री, स्नेहल जाधव, दशरथ गावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेले एक ते दीड वर्ष स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या स्वानंदीला औषधोपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी वि स खांडेकर चे मुख्याध्यापक राजाराम पवार 9850737471 ह्या नंबरशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे.