
कणकवली : हरकुळ बुद्रुक येथे काणेकर यांच्या दुकानाला अचानक रविवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जाऊन खाक झाले होते. माहिती मिळतात आ. नितेश राणे हरकुळ बुद्रुक येथे जाऊन घटनेचा आढावा घेतला व काणेकर कुटुंबियांना आधार देत त्यांना तातडीची आर्थिक मदत देखील केली.
यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,वर्देकर ,राजू पेडणेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाकडून देखील मदतीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.