केसरकरांवर उपरकरांचा हल्लाबोल !

Edited by: विनायक गावस
Published on: June 21, 2023 17:29 PM
views 109  views

सावंतवाडी : दीपक केसरकर शिक्षणमंत्री होऊन जिल्ह्याला संभाळू शकत नाहीत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले विकासाचा शब्द ते पूरे करू शकत नाहीत. ते महाराष्ट्र शिक्षण विभागाचा विकास शिक्षणमंत्री म्हणून काय करणार ? असा सवाल मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे उपस्थित केला आहे. दरम्यान गेली अनेक वर्षे कोकणाचा १० वी १२ वी निकाल राज्यात अव्वल असताना मात्र अशा शिक्षणमंत्र्यांनामुळे जिल्हाचा दर्जा घसरू शकतो अशी टिका त्यांनी यावेळी केली आहे.


यावेळी ते पुढे बोलतात म्हणाले, की मल्टीपेशिलीटी हाॅपिस्टल प्रश्न सुटला असे वारंवार केसरकर यांनी सांगितले.  मात्र, उद्याप तो प्रश्न सुटला नाही. फक्त जनतेची फसवणूक करण्याचे काम ते करत असून जोपर्यंत ते मंत्री पदावररून हटत नाहीत तो पर्यंत त्या हाॅपिस्टल प्रश्न सुटणार नसल्याचे त्यानी यावेळी सांगितले. उपरकर म्हणाले, केसरकर यांनी मंत्रीपद फक्त स्वःताच्या स्वार्थासाठी मिळवले. केसरकर हे मुख्यमंत्र्यांकडे शिक्षण खात्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करायची सोडून दारू दर कमी करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजा, चरस विक्री सुरू आहे. आता त्यासाठी केसरकर यांनी अधिकृत परवानगी मिळण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी असा उपरोधिक टोला ही त्यांनी यावेळी लगावला.यावेळी मनसेचे आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.