
दोडामार्ग : आजच्या आश्विन अमावस्या दिनी व दीपावलीच्या शुभमुहूर्तावर साटेली गावठणवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने “साटेली गावठणवाडी” या फलकाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात अनावरण करण्यात आले. यावेळ बुधाजी मोरगावकर, व भिकाजी गणपत्ये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या मंगलप्रसंगी ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या आणि वाडीच्या अभिमानाचा आणि ओळखीचा नवा टप्पा साजरा केला. फलकाचे अनावरण झाल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.
सुरुवातीला जेथे गाव वसला ती जागा म्हणजेच गावठणवाडी म्हणून ओळखली जाते. याच भूमीवर साटेली गावाचे मूळ रोप रुजले, आणि हळूहळू दोन अवाटांची मिळून ही वाडी विकसित झाली. त्यामुळे ‘गावठणवाडी’ हे नाव केवळ भूगोल नव्हे, तर इतिहास, परंपरा आणि पिढ्यांचा अभिमान सांगणारे नाव आहे. या नावाचा फलक लावून ग्रामस्थांनी आपल्या मुळांशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.गावठणवाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीपासून गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात याच वाडीतून होते.
कार्यक्रमास ग्रामस्थ शिवराम धर्णे, जयसिंग राणे, प्रभाकर राणे, मंदार गणपत्ये, निळू धर्णे, विश्वनाथ राणे, न्हानजी राणे, दशरथ पडते, सुर्यकांत धर्णे, यशवंत पडते, कृष्णा धर्णे, विनायक पडते, परशुराम धर्णे,देवानंद मयेकर,नारायण ठाकुर, संतोष तांबे,नारायण धर्णे, अभय धर्णे, एकनाथ धर्णे, रिकेश धर्णे, गोविंद गवस, लखन सुतार, आनंद नाईक,अथर्व पडते, संतोष सुतार, संदीप गवस, श्री अष्टविनायक सेवक भजन मंडळाचे अध्यक्ष बुवा.सिद्धेश उर्फ गोट्या धर्णे,लक्ष्मी धर्णे, प्राजक्ता राणे, शोभा राणे, रुक्मीणी धर्णे, लक्ष्मी पडते यांसह श्री अष्टविनायक सेवक भजन मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.