
वैभववाडी : मेरी मिठी मेरा देश या अभियानांतर्गत आज ता १४ ग्रामपंचायत कोळपे येथे शीला फलकाचे अनावरण झाले.गावचे सरपंच सुनील कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला आले.
आझादी का अमृतमहोत्सव या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत कोळपे ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी गावात सैनिक स्मारक बांधण्यात आले.याच अनावरण आज संपन्न झाले.
यावेळी उपसरपंच सहीदा इसफ, ग्रा. पं. सदस्य दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, विलास माने, ग्रामसेवक सचिन चव्हाण आरोग्य सेवक एस व्ही प्रभ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.